ब्रेकिंग! एअर इंडियाच्या आणखी एका विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग

Admin
1 Min Read
  • अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची घटना ताजी आहे. या परिस्थितीत आता एअर इंडियाच्या आणखी एका विमानाचे हाँगकाँग एअरपोर्टवर तातडीने लँडिंग करण्यात आले. AI 315 या एअर इंडियाच्या विमानाने आज सकाळी हाँगकाँगवरुन दिल्लीला येण्यासाठी उड्डाण केले होते. पण हवेत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. एअर इंडियाचे हे बोइंग 787-8 ड्रीमलायनर विमान होते. हाँगकाँगवरुन दिल्लीला जाण्यासाठी या विमानाने उड्डाण केले होते. तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकाने माघारी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हाँगकाँग एअरपोर्टवर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हा तांत्रिक बिघाड काय आहे? ते अजून स्पष्ट झालेले नाही. मागच्या आठवड्यात अहमदाबाद एअरपोर्टरुन उड्डाण केलेले एअर इंडियाचे विमान काही मिनिटात कोसळले होते. यात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
  • त्यामुळे एअर इंडियाबद्दल लोकांच्या मनात राग आहे. एअर इंडियाच्या विमानांचा मेन्टेनस, वैमानिकांची ट्रेनिंग यावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Share This Article