एअर इंडियाच्या दुबईहून जयपूरला येणाऱ्या विमानातील भयंकर प्रकार

Admin
1 Min Read
  • अहमदाबाद विमान अपघातानंतर दरम्यान दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटला पाच तास उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उड्डाण करण्यास हा विलंब झाल्याचे समजते. मात्र, या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दुबई विमानतळावर विमानात बसलेले प्रवासी एसी शिवायच बसले होते. प्रवाशांमध्ये लहान मुले आणि वृद्धही होते. प्रचंड उष्णतेमुळे अनेकांची प्रकृती ही बिघडली.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले आहे की, दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट IX 196 मध्ये प्रवाशांना पाच तास एसी न चालवता बसवून ठेवण्यात आले. यावेळी विमानात उपस्थित वृद्ध आणि लहान मुलांची तब्येत बिघडली. ही घटना 13 जूनच्या रात्रीची आहे. दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट IX 196 ला निर्धारित वेळेनुसार 7:25 वाजता दुबईहून निघायचे होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे तिच्या उड्डाणाला काही तास उशीर झाला.
  • प्रवाशांनी सांगितले की, एसीशिवाय आम्ही 5 तास प्रचंड उष्णतेत विमानात बसून राहिलो. यावेळी लहान मुले रडत होती आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत होता. हे प्रकरण आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रवाशांनी DGCA आणि एअरलाईन्स व्यवस्थापनाकडून उत्तर मागितले आहे.
Share This Article