- पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात एन्काऊंटर शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 23) असे या सराईत गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस त्याच्या मागावर होते. तो गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मोक्यातील हा फरार आरोपी ठार झाला. यावर पुणे पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.
- शाहरूखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार होता. काही प्रकरणात तो पोलिसांना हवा होता. पोलीस त्याच्या शोधात होते. तो सोलापूर जिल्ह्यात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक मध्यरात्री लांबोटी येथे आले होते.
- लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुखने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबारला प्रत्युत्तर देताना शाहरुख गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- भल्या पहाटे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. पोलिस आल्याची भनक लागताच शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला. त्याला शरण येण्याची संधी देण्यात आली. पण त्याने गोळीबार केला.
सराईत गुंडाचा सोलापुरात एन्काऊंटर
