क्राईम
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी नीच पातळी ओलांडली

- जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी आज केलेल्या भीषण हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात ही घटना घडली आहे. जिथे सध्या उन्हाळ्यामुळे हजारो पर्यटक भेटी देत आहेत.
- या हल्ल्यामागे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून त्यांच्यावर गोळीबार केला.



