सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरातील लाडक्या बहिणींना खुशखबर

सोलापूर -मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 400 पेक्षा अधिक बसेसच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहतील याचे नियोजन केलेले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व संबंधित विभागांची पूर्वतयारी झालेली आहे. परंतु दिलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत चोखपणे पार पाडून परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

माझी लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळा हा कार्यक्रम मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी बारा वाजता होम मैदान सोलापूर शहर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला उपस्थित राहाव्यात असे, आवाहन यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Back to top button