- नोकिया आता पुन्हा एकदा जुन्या काळात जात आहे. नोकियाच्या इतिहासात सर्वाधिक विक्री झालेला फोन म्हणून ओळखला जाणारा नोकिया ११०० पुन्हा बाजारात आणण्याची तयारी नोकियाने केली आहे. यावेळी नोकिया ११०० हा केवळ एक मोबाईल नसून तो एक छोटा DSLR कॅमेरा असेल, असे कंपनीने सांगितले आहे.
- नोकियाने २००३ मध्ये पहिल्यांदा नोकिया ११०० लाँच केला, तेव्हा तो एक आयकॉनिक फोन होता. साधा, मजबूत आणि स्वस्त फोन जो पावसातही सहज चालायचा. बॅटरी तर अक्षरशः खूपच दिवस टिकायची.
- २०२५ मध्ये नोकियाने कोणीही कल्पनाही केली नसेल असा शोध लावला आहे. ११०० ला पुन्हा जिवंत करून ४G मध्ये मोठ्या ट्विस्टसह लाँच करण्याची तयारी आहे. आता हा फक्त कॉल आणि मेसेजचा फोन राहिलेला नाही, तर तो आयुष्यभरच्या आठवणींना व्यावसायिक पातळीवर कॅप्चर करेल. DSLR दर्जाचा कॅमेरा असलेला हा जगातील पहिला छोटा फोन असेल.
- नोकियाने सांगितले की, हा फोन सर्वांसाठी नाही. स्मार्ट फोनमधील अनावश्यक अॅप्सपासून मुक्ती हवी असणाऱ्यांसाठी, हलका पण पॉवरफुल फोन हवा असणाऱ्या ट्रॅव्हल फोटोग्राफर्ससाठी हा फोन बेस्ट आहे. नोटिफिकेशनच्या भडिमारशिवाय आठवणींना साठवू इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा फोन बेस्ट आहे. शर्टच्या खिशात बॅकअप कॅमेरा हवा असणाऱ्या व्यावसायिक फोटोग्राफर्ससाठी हा फोन आहे.
- मूळ ११०० त्याच्या अद्भुत बॅटरी लाइफसाठी ओळखला जात होता, पण नवीन ११०० त्याला पूर्णपणे नवीन स्तरावर घेऊन जातो. ६००० mAh बॅटरीसह, तुम्ही एकाच चार्जवर चार आठवडे नियमित वापर करू शकता. दररोज चार्जर शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
- दररोज तासन्तास बोललात तरी दोन आठवडे ही बॅटरी नक्कीच टिकेल. या स्मार्ट फोनची किंमत अंदाजे १९९ US डॉलर्स म्हणजेच १८ हजार रुपये असण्याची शक्यता आहे.
एकच नंबर! नोकिया 1100 ची धमाकेदार एंट्री
