क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला

  • अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेमागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. या अपघाताने अवघा देश सुन्न झाला असून मृतांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने सारेच हेलावून गेले आहेत. छिन्नविच्छिन्न झालेले 270 मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून त्यातील सात जणांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. 
  • या मृतांमध्ये महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे. दरम्यान, एनआयए, डीजीसीए, ब्रिटनची आयबा यासह सात एजन्सी चौकशी करणार आहेत. काल डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या छतावर विमानाचा ब्लॅक बॉक्स आढळून आला असून अपघाताच्या तपासाला त्यामुळे गती मिळणार आहे.
  • आतापर्यंत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 270 हून अधिक मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. याशिवाय 220 जणांचे डीएनए सॅम्पलिंग करण्यात आले असून सात मृतदेहांची ओळख पटली आहे.

Related Articles

Back to top button