हवामान

ब्रेकिंग! राज्यात मान्सूनचा कहर; अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस

  • सध्या राज्यात मान्सूनचा कहर दिसून येत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने काहीसा ब्रेक घेतला. त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी धो-धो पाऊस पडत आहे. 
  • दरम्यान, पुढील काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. पुण्यासह, मुंबई-कोकण आणि मध्य व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार तर अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
  • हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार आहे. राज्यात १४ ते १९ जूनदरम्यान अति मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार आहे.

Related Articles

Back to top button