क्राईम

अहमदाबाद विमान अपघातात पुन्हा दुर्दैव! ‘त्या’ महिलेचे सिंदूर पुसले

  • अहमदाबाद येथील विमानतळावर काल एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानात सुमारे २५० प्रवासी व क्रू मेंबर्स होते. विमान झेप घेतानाच काही क्षणांत त्याचा संपर्क तुटला व त्यानंतर अपघात झाला. AI 171 हे फ्लाईट लंडनकडे रवाना होत होते. अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण करणारे हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलायनर होते. दरम्यान, वडोदरा शहरात वाडी शहरात राहणाऱ्या माहेश्वरी कुटुंबात दोन दिवसांपूर्वीच लग्नाचे आनंदी वातावरण होते. या कुटुंबातील भाविक माहेश्वरीचे दहा जून रोजी कोर्ट मॅरेज झाले. मात्र, या घरात आता दु:खद वातावरण पाहायला मिळत आहे. लग्नाच्या फक्त दोन दिवसांनंतरच भाविकचा अहमदाबादमधील विमान अपघातात मृत्यू झाला.  
  • भाविक माहेश्वरी मागीत बऱ्याच वर्षांपासून लंडनमध्ये काम करत होता. दरवर्षी तो 15 दिवसांसाठी आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वडोदराला यायचा. भाविकचे आधीच लग्न ठरवण्यात आले होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने त्यांचे कोर्ट मॅरेज झाले.
  • लग्नानंतर वडोदराहून परत लंडनला त्याचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी त्याच्या नवविवाहित पत्नीने त्याला हसत हसत शुभेच्छा दिल्या. मात्र, आपल्या पतीला असा निरोप देण्याची ही शेवटची वेळ असेल असा तिने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. फ्लाइटमध्ये चढल्यानंतर काही तासातंच एअर इंडियाचे विमान उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातंच क्रॅश झाल्याची बातमी समोर आली आणि याच विमानात भाविक प्रवास करत होता.
  • या बातमीमुळे माहेश्वरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांना भाविकच्या मृत्यूवर अजूनही विश्वास बसत नाही. या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे. 

Related Articles

Back to top button