खेळ

विराट कोहलीला अटक होणार?

  • रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा खेळाडू विराट कोहलीच्या अडचणीत वाढ झाली आहे. आरसीबीच्या विजयानंतर पार पडलेल्या व्हिक्टरी परेड दरम्यान जी चेंगराचेंगरी झाली आणि १० ते १२ लोकांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी विराट विरोधात पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. नायजा होर्टागारा वेदिके यांचे प्रतिनिधी ए.एम. वेंकटेश यांनी क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये विराटच्या विरोधात तक्रार दाखल केली.
  • विराट विरोधात तक्रार मिळाल्यानंतर, पोलिस विभागाने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले. याबाबत पोलिसांकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये म्हंटले कि, सामाजिक कार्यकर्ते वेंकटेश यांनी विराट विरोधात तक्रार दाखल केली आहे. क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये १२३/२०२५ अंतर्गत आधीच नोंदवलेल्या गुन्ह्याअंतर्गत त्याची चौकशी केली जाईल.
  • तत्पूर्वी, कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरसीबी फ्रँचायझी, इव्हेंट कंपनी डीएनए आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या प्रशासकीय समितीने आवश्यक सरकारी परवानगीशिवाय हा कार्यक्रम आयोजित केला होता. एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांचा समावेश आहे, ज्यामध्ये कलम १०५ समाविष्ट आहे, जे खून नसून जाणूनबुजून मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरसीबीचे वरिष्ठ मार्केटिंग अधिकारी निखिल सोसाळे यांच्यासह चार जणांना अटक केली आहे. सोसाळे हे बंगळुरूहुन मुंबईला जात होते, त्याचवेळी पहाटे बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह डीएनएचे तीन स्टाफ मेंबर्स किरण, सुमंथ आणि सुनील मॅथ्यूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्या सर्वांची क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात चौकशी सुरु आहे. आता विराटच्या अटकेबाबत पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Related Articles

Back to top button