ब्रेकिंग! ऑपरेशन सिंदूरबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Admin
1 Min Read
  1. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते. मात्र, यानंतर देशात सत्ताधारी आणि विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूरवर जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी होत आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, केंद्र सरकारकडून संसदेच्या मान्सून अधिवेशनासाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
  2. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत संसदेचा पावसाळी अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची माहिती रिजिजू यांच्याकडून देण्यात आली आहे.
  3. तर दुसरीकडे विरोधक सुरक्षा धोरण, ऑपरेशन सिंदूर, पहलगाम दहशतवादी हल्ला, महागाई आणि बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारवर हल्लाबोल करु शकतात.
  4. ऑपरेश सिंदूरनंतर एका मुलाखतीमध्ये भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानशी झालेल्या तणावादरम्यान भारताचे देखील नुकसान झाले, असे सांगितले होते. यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे इंडिया आघाडीत समाविष्ट 16 पक्षांनी काल केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याच्या उद्देशाने संयुक्त बैठक घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. 
Share This Article