क्राईम

ब्रेकिंग! आरसीबीच्या सेलिब्रेशन मिरवणुकीत अनर्थ घडला

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मिळवलेल्या आयपीएल विजेतेपदाला गालबोट लागले आहे. या ऐतिहासिक विजेतेपदाबद्दल बंगळुरुमध्ये विजयी परेड काढण्यात येणार होती. या कार्यक्रमाच्या पूर्वी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या चेंगराचेंगरीत 50 जण जखमी झाल्याचा अंदाज आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
  • आरसीबीची टीम त्यांच्या विजयाचा जल्लोष करत होती. या आनंद सोहळ्यात हजारो चाहते उपस्थित होते. आरसीबीचे हे पहिलेच आयपीएल विजेतेपद आहे. त्यामुळे फॅन्स प्रचंड उत्साहात होते. पण, या उत्साहाला गालबोट लागले.
  • आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्या सन्मानार्थ कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने एका समारंभाचे आयोजन केले होते, ज्यात हजारो चाहते मोठ्या संख्येने पोहोचले होते. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमा झालेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी लाठीचार्जही केला. हजारो लोकांच्या उपस्थितीमुळे गर्दी अचानक अनियंत्रित झाली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती आहे.

Related Articles

Back to top button