ब्रेकिंग! ऑपरेशन सिंदूर हे बदलत्या भारताचे चित्र

Admin
1 Min Read
  • ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा 122 वा भाग प्रसारित झाला. यावेळी मोदींनी देशवासियांना संबोधित करताना ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत दहशतवादाविरुद्ध एकत्र आल्याबद्दल त्यांनी देशवासीयांचे कौतुक केले तसेच दहशतवाद संपवायचा हा आपला संकल्प आहे, असा निर्धारही बोलून दाखवला.
  • मोदी म्हणाले, आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट झाला आहे, तो संतापाने भरलेला आहे आणि दृढनिश्चयी आहे. आज प्रत्येक भारतीयाचा संकल्प आहे की, आपल्याला दहशतवाद संपवायचा आहे. मित्रांनो, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान आपल्या सैन्याने दाखवलेल्या शौर्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला आहे. आपल्या सैन्याने सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे अड्डे ज्या शुद्धतेने, अचूकतेने उद्ध्वस्त केले आहेत ते आश्चर्यकारक आहे.
  • ऑपरेशन सिंदूरने जगभरातील दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नवा आत्मविश्वास आणि उत्साह दिला आहे. ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक लष्करी मोहीम नाही, तर ते आपल्या दृढनिश्चयाचे, धैर्याचे आणि बदलत्या भारताचे चित्र आहे आणि या चित्राने संपूर्ण देशाला देशभक्तीच्या भावनांनी भरले आहे, तिरंग्यात रंगवले आहे, असेही मोदी म्हणाले. 
Share This Article