- भारताकडून वाईटरित्या पराभूत झालेला पाकिस्तान आजकाल आपला विजय साजरा करत आहे. पाकिस्तान सरकार लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या प्रत्येक कृतीचे कौतुक करत आहे. पाकिस्तान सरकारचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
- आता त्यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती दिली आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानचा मोठा पराभव झाला असताना ही बढती देण्यात आली आहे. पाकिस्तान हा आपल्या देशाचा विजय झाला आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून जनतेची दिशाभूल होऊ शकेल.
- पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तान मंत्रिमंडळाने लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली आहे. मुनीर हे पाकिस्तानच्या इतिहासातील दुसरे फील्ड मार्शल बनले आहेत. यापूर्वी, अयुब खान यांनी १९५९-१९६७ दरम्यान हे पद भूषवले होते. भारतीय सैन्याकडून झालेल्या दारुण पराभवानंतर जनरल मुनीर यांना हे पद देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, असे मानले जाते की, शाहबाज सरकारने सैन्याचे खचलेले मनोबल वाढवण्यासाठी मुनीरचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.
- पाकिस्तानी लष्करात फील्ड मार्शल हे सर्वोच्च दर्जाचा पद आहे. हे पाकिस्तानी सैन्याचे पंचतारांकित पद आहे. पाकिस्तान सरकारने लष्करप्रमुखांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा दर्जा दिला आहे. हे पद लष्कराचे जनरल, हवाई दलाचे एअर चीफ मार्शल आणि नौदलाचे अॅडमिरल यांच्यापेक्षा वरचे आहे. पाकिस्तानी सैन्यात हे मानद पद आहे. यामध्ये कोणतीही अतिरिक्त जबाबदारी किंवा पगार वाढ नाही. हे पद खूप कमी अधिकाऱ्यांना मिळू शकते. नियमांनुसार, युद्धादरम्यान अपवादात्मक पद्धतीने सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला फील्ड मार्शल म्हणून नियुक्त केले जाते.
ब्रेकिंग! निर्लज्ज पाकिस्तानचा नवा डाव
