सोलापूर
सोलापूर! बाईक घसरली, घात झाला

- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी गोपाळ मुदगल (वय ५५) यांचे सोमवारी खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गोपाळ मुदगल यांचा १५ मे रोजी अक्कलकोट रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिराजवळ दुचाकी गाडी घसरून अपघात झाला होता.
-
त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर अक्कलकोट रस्ता स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.