भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानचा सर्वनाश करणार

Admin
1 Min Read
  • पहलगाम हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करत ते उद्ध्वस्त केले. यात शंभर अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळे दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांना भारताकडे डोळे वटारले तर, विनाशच होतो हे समजले असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ते पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी भारतीय सैन्याच्या जवानांना संबोधित करताना बोलत होते. पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा नाही जिथे दहशतवादी लपू शकतील, आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांना मारू आणि त्यांना पळून जाण्याची संधी देणार नाही, असा सज्जड दम वजा इशारा मोदींनी दिला आहे.
  • भारताचे ड्रोन, क्षेपणास्त्रांचा विचार करून पाकिस्तान अनेक दिवस झोपू शकणार नाही. आमच्या सैन्याने दहशतवाद्यांना चिरडून टाकले असून भारतीय सैन्य न्यूक्लियर धमकीची हवा काढून टाकते असे म्हणत पाकिस्तान दहशतवादावर अवलंबून असल्याचे मोदी म्हणाले. तुम्ही सर्वजण देशाच्या वर्तमानासाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक नवीन प्रेरणा बनला आहात. आज या वीरांच्या भूमीतून, मी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्व शूर सैनिकांना आणि बीएसएफच्या वीरांना सलाम करतो. तुमच्या शौर्यामुळे, ऑपरेशन सिंदूर जगभर गाजत असून प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही मोदींनी जवानांना दिला.
Share This Article