देश - विदेश
जबरदस्त! चायना मेड हत्यारे फेल, पाकिस्तानचे अब्जावधी बुडाले

- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला. या मोहिमेत भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहिमेत पाकिस्तानचे मोठे नुकसान तर झालेच, शिवाय पाकिस्तानकडील चिनी हत्यारांची पोलखोल झाली. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्या चिनी बनावटीच्या हत्यारांची मदत घेतली ती सगळीच हत्यारे अपयशी ठरली.
- सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चिनी रॉकेट धडाधड हाणून पाडले. या मोहिमेत सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीरमधील एकूण दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
- भारताच्या या कारवाईला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने भारताचे लष्करी तळ आणि नागरिकांवर हल्ल्याचे प्रयत्न केले. यासाठी चिनी बनावटीच्या हत्यारांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. तुर्कीच्या ड्रोनचाही उपयोग करण्यात आला. पण भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टीमने एकही ड्रोन आणि मिसाईल हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. ड्रोन आणि मिसाईल हवेतच नष्ट करण्यात आले. याचा मोठा धक्का पाकिस्तान सैन्याला बसला आहे.
- काही रिपोर्ट्सनुसार तणावाच्या काळात चीन पाकिस्तानला सातत्याने हत्यारांचा पुरवठा करत होता. परंतु चीनने असे सर्व दावे नाकारले आहेत. दहशवादविरुद्ध चीन आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण चीनचा खरा चेहरा आधीच जगासमोर आलेला आहे. त्यामुळे चीनच्या या खुलाशावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. यात एक गोष्ट स्पष्ट आहे की, पाकिस्तानला चीनकडून हत्यारे मिळाली होती. याच हत्यारांचा वापर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी केला. भारतीय सैन्यानेही चिनी मिसाईल पाडल्याची माहिती दिली आहे.



