बिग ब्रेकिंग! भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचा पाकिस्तानचा प्लॅन?

Admin
1 Min Read
  • भारताच्या हवाई हल्ल्याने पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. भारताच्या हल्ल्याने घाबरलेल्या पाकिस्तानने अणुबॉम्बचा वापर करण्याबाबत बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला होता. पण, अमेरिकेने लगेच हस्तक्षेप करताच पाकिस्तानने ही बैठक रद्द केली आहे. 
  • पाकिस्तानने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली होती. त्यापूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांना फोन केला. या दोघांच्या चर्चेनंतर ही बैठक रद्द करण्यात आली आहे. 
  • रुबियो आणि मुनीर यांच्यात काय बैठक झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. पण, अमेरिकेने दबाव टाकल्यानेच पाकिस्तानने ही बैठक रद्द केल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळेच शाहबाज शरीफ यांनी माघार घेतली आहे. 
  • भारतावर करण्यात आलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले अयशस्वी झाल्याने पाकिस्तान संतापला आहे. त्यामधूनच पाकिस्तानने नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली होती. पाकिस्तान सैन्य आणि सरकारची ही उच्च समिती आहे. ही समिती अणुबॉम्ब वापराचा निर्णय घेते. पाकिस्तान सरकारमधील महत्त्वाचे मंत्री आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी या समितीचे सदस्य आहेत.
Share This Article