- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा तयारीबाबत मोठे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाने देशातील अनेक राज्यांना उद्या ७ मे रोजी एक व्यापक नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉक ड्रिल अंतर्गत महत्त्वाचे उपक्रम राबवले जातील. या काळात हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील. हे मोठे धोके आणि शत्रूच्या कारवायांबद्दल अलर्ट जारी करण्याशी संबंधित एक पाऊल आहे.
- संभाव्य हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक नागरी संरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण दिले जाईल. क्रॅश ब्लॅकआउटची व्यवस्था केली जाईल. याअंतर्गत, शत्रूच्या हवाई देखरेखीपासून किंवा हल्ल्यापासून शहरे आणि संरचना लपविण्यासाठी आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केले जातील.
- मॉक ड्रिल ही एक प्रकारची “प्रॅक्टिस” आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की जर एखादी आपत्कालीन परिस्थिती (जसे की हवाई हल्ला किंवा बॉम्ब हल्ला) आली. तर सामान्य लोक आणि प्रशासन किती आणि कसे प्रतिक्रिया देतील.
- ब्लॅकआउट रिहर्सल म्हणजे संपूर्ण परिसरातील दिवे ठराविक काळासाठी बंद करणे. जर शत्रू देशाने हल्ला केला तर अंधारात परिसर कसा सुरक्षित ठेवता येईल हे दाखवणे हा त्याचा उद्देश आहे. यामुळे शत्रूला लक्ष्य करणे अवघड होऊन जाते.
उद्या रॉकेट, क्षेपणास्त्र अन् हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजणार
