मनोरंजन

पाकिस्तानने युद्ध जिंकले तर माधुरी दीक्षितला घेऊन जाईन

पाकिस्तानातील एका मौलानाने (धार्मिक नेत्याने) भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह व महिलांविरोधी विधानाने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. एका व्हिडिओमध्ये संबंधित मौलाना आपल्या मुलासोबत बसलेला दिसतो आणि असे विधान करतो की, जर पाकिस्तानने भारताशी युद्ध जिंकले, तर मी माधुरी दीक्षितला घेऊन जाईन.

हे विधान केवळ वाईट नजर दर्शवणारे नाही, तर त्यामध्ये लैंगिक दुजाभाव, राष्ट्रवादाचा विकृत प्रकार आणि बिनबुडाचे स्वप्नरंजन यांचा घाणेरडा संगम असल्याची टीका अनेक नेटिझन्स, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

या व्हिडिओने अशा वेळी वाद निर्माण केला आहे, जेव्हा पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याने भारतात संतापाचे वातावरण आहे. अशा संवेदनशील क्षणी शेजारील देशातून आलेले हे वक्तव्य केवळ असंवेदनशील नाही, तर द्वेष आणि द्वेषयुक्त राष्ट्रवादाला खतपाणी घालणारे मानले जात आहे.

Related Articles

Back to top button