ब्रेकिंग! आम्हाला वाचवा! पाकिस्तान भारताच्या जवळच्या मित्रांच्या दारात

Admin
1 Min Read
  • पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव सुरु आहे. भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रासंघाकडे धाव घेतली आहे. पाकिस्तान राजदुताची सुरक्षा परिषदेत बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संभाव्य प्रयत्नांवर चर्चा झाली.
  • पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताकडून लष्करी कारवाई होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननेच घाईघाईने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सुरक्षा परिषदेची बैठक बोलावून भारताला संयम बाळगण्याचे सांगितले. परंतु, ही बैठक सभागृहात नाही तर चेंबरमध्ये झाली.
  • पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार यांनी बैठकीनंतर सांगितले की, सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू आणि काश्मीर वादासह सर्व मुद्दे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची गरज ओळखली. प्रादेशिक स्थिरता एकतर्फी राखता येत नाही, हे देखील स्पष्टपणे मान्य करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आवश्यक आहे, असे ठरल्याचे इफ्तिखार यांनी सांगितले.
  • दरम्यान पाकिस्तान भारताच्या मित्र राष्ट्रांकडे हल्ला न करण्याची विनंती करण्याची मागणी करत आहे. याबाबत पाकिस्तानने इराण, अमेरिका, रशियाची मदत मागितली आहे.
Share This Article