बॉलिवूडची ड्रामाक्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत नेहमीच कोणता ना कोणता नवा ड्रामा करत असते त्यातूनच ती अनेकदा अडचणीत देखील येते. आता एक धक्कादायक वक्तव्य राखीने केले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यावर नेटकरांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या व्हिडिओवरून राखी सावंतला थेट महाराष्ट्रातून हाकलून देण्यात यावे, असे म्हटले आहे.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये राखी प्रतिज्ञा घेत आहे. त्यावेळी ती म्हणते की, मी राखी सावंत आहे. मी खरं बोलेन. खऱ्या शिवाय काहीही बोलणार नाही. पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्यासोबत आहे. जय पाकिस्तान. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. नेटकऱ्यांकडून तसेच अनेक राजकीय नेत्यांकडून देखील तिच्या या व्हिडिओवर संताप व्यक्त केला जात आहे.