देश - विदेश
तरुण सीमा हैदरच्या घरात घुसला अन् झाला मोठा कांड

- सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगल्या आहेत. अशातच गुजरातचा एक तरुण सीमाच्या घरात घुसल्याने खळबळ माजली आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा आणि सचिनने माझ्यावर काळी जादू केली, असा आरोप या तरुणाने त्यांच्यावर केला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
- रबूपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या सीमा आणि सचिन मीनाच्या घरात एक अज्ञात तरुण घुसला. त्यानंतर सीमा हैदर आणि सचिनने या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नोएडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, सीमाच्या घरात घुसणारा तरुण गुजरातचा रहिवासी आहे. तेजस झानी असे त्या तरुणाचे नाव आहे. तपसा दरम्यान, तेजसने खळबळजनक दावा केला आहे.
- सीमा आणि सचिनने त्याच्यावर काळी जादू केली आहे. त्यामुळे मी सीमाच्या प्रेमात पडलो. म्हणून मी स्वत:ला रोखू शकलो नाही आणि सीमाच्या घरी गेलो. मी पूर्णपणे काळी जादूच्या प्रभावात आहे आणि सीमाच्या प्रेमात पडलो आहे, असे आरोपी तेजसने सांगितले.