राजकीय
ब्रेकिंग! मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जेष्ठ नेते शरद पवार यांना प्रश्न विचारत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे हे सांगण्याची मागणी केली आहे. या विधानाने राज्यातील विरोधी पक्षांची जोरदार अडचण निर्माण झाली आहे.
फडणवीस म्हणाले, पवारसाहेब, सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे सांगणे महत्त्वाचे आहे. मतदारांना माहिती असणे गरजेचे आहे. आम्ही तयार आहोत, पण तुम्ही कोणावर विश्वास ठेवला आहे हे सांगा.
हे विधान झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचे मत आहे की हे फडणवीसांचे विधान राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीतील एकता आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा हा प्रयत्न असू शकतो.