देश - विदेश

ब्रेकिंग! आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत

  • पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्याला भारतीय हवाई दलाने मध्यरात्री एअर स्ट्राईक करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानमधील २१ दहशतवादी छावण्यांवर आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील ९ दहशतवादी छावण्यांवर एअर स्ट्राईक करत हे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, यानंतर सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
  • तसेच रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे.
  • ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती वेगाने बदलत आहे. हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यानंतर गृह मंत्रालयाने आता एक मोठे पाऊल उचल आहे. बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफसह सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व सैनिकांनी दक्षतेने कर्तव्यावर उपस्थित राहावे आणि सीमावर्ती भागात जास्तीत जास्त उपस्थिती राखावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत.

Related Articles

Back to top button