देश - विदेश

यूट्यूब चॅनेलवरुन प्रक्षोभक, चिथावणीखोर, खोटी, चुकीची माहिती प्रसारित

  • पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्राने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण 6.3 कोटी सबस्क्राइबर असलेल्या सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.
  • बंदी घातलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचे ‘100mph’ डॉन, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज या वृत्तसंस्थांचे यूट्यूब चॅनेल समाविष्ट आहेत. पत्रकार इर्शाद भट्टी, आस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांच्या यूट्यूब चॅनेलवर देखील बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेल्या इतर हँडलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांचा समावेश आहे.
  • सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाम दुर्घटनेनंतर शेजारील देशांमधील तणावपूर्ण संबंध आहे. दरम्यान हे यूट्यूब चॅनेल भारत, त्याच्या सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री, खोटे आणि दिशाभूल करणारे कथन आणि चुकीची माहिती प्रसारित करत आहेत. 

Related Articles

Back to top button