देश - विदेश
ब्रेकिंग! कंगाल पाकिस्तानचा नवा डाव

- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारताने उचललेल्या कठोर पावलांचा परिणाम पाकिस्तानमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. भारताने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या मित्र राष्ट्रांकडे मदतीचा हात पुढे करायला सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने चीनकडून दहा अब्ज युआन कर्ज मागितले आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली.
- रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने चीनकडून दहा अब्ज युआन कर्ज मागितले. औरंगजेब यांनी या मुलाखतीदरम्यान म्हणाले की, पाकिस्तानने चीनला त्यांची विद्यमान स्वॅप लाइन दहा अब्ज युआन (१.४ अब्ज डॉलर्स) पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकीदरम्यान रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत औरंगजेब बोलत होते. पाकिस्तानकडे आधीच ३० अब्ज युआनची स्वॅप लाइन असल्याची माहिती औरंगेजब यांनी दिली. दरम्यान, पाकिस्तानने चीनकडे मागितलेले दहा अब्ज युआनची किंमत पाकिस्तानी चलनात अंदाजे ३९, ३३३ कोटी रुपये इतकी आहे.