कर्नाटक सीएम सिद्धरामय्यांची पाकिस्तानी मीडियात थेट हेडलाईन

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पाकचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ आणि पाकिस्तान सरकारची भाषा बोलत आहेत का? पहलगाम हत्याकांडाबद्दल काँग्रेस पक्ष सध्या पाकिस्तानचा बचाव करण्यात व्यस्त आहे का? अशी शंका भाजपचे ज्येष्ठ नेते अमित मालवीय यांनी उपस्थित केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पहलगाम हत्याकांडाला सुरक्षा यंत्रणेतील मोठे अपयश म्हटले होते आणि त्यासाठी सरकारला जबाबदार धरले. या मुद्द्यावर पाकिस्तानसोबत युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. आता पाकिस्तानातील माध्यमांनी सिद्धरामय्या यांचे वक्तव्य ढाल म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यांचा या विधानाचा पाकिस्तानी मीडियात हेडलाईन करून पुरेपूर वापर करण्यात आला आहे.
मालवीय यांनी पाकिस्तानच्या जिओ टीव्ही न्यूज चॅनलची क्लिप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली. या क्लिपमध्ये, न्यूज अँकर वारंवार सिद्धरामय्या यांचे विधान दाखवत आहे आणि म्हणत आहे की, पहलगाम हल्ला हा भारताच्या सुरक्षा यंत्रणेचे अंतर्गत अपयश आहे.
पाकिस्तानला यात अनावश्यकपणे ओढले जात आहे. हे शेअर करताना अमित मालवीय यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, काँग्रेस पाकिस्तानच्या बचावासाठी पुढे आली आहे.