देश - विदेश

ब्रेकिंग! भारताकडून मोठ्या लष्करी कारवाईची शक्यता

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. यावेळी जाणून बुजून हिंदू पर्यटकांना ठार मारण्यात आले. तुम्ही मोदीला डोक्यावर चढवून ठेवले आहे, असे हे दहशतवादी यावेळी म्हणत होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून मोठी लष्करी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पीओकेमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केला आहे. त्यामुळे सिंधू नदीत भारताकडून सोडण्यात येणारे पाणी थांबवण्यात आले आहे. तसेच भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. भारतातील पाकिस्तानी दुतावास बंद करण्यात आले आहे. अटारी सीमा बंद करण्यात आली आहे. काश्मिरातील सीमेवर दोन्ही सैन्याकडून तुरळक गोळीबार सुरु असला तरी अद्याप मोठी कारवाई करण्यात आलेली नाही.

पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची घरे भारतीय लष्कराच्या जवानांनी स्फोटके लावून उडवली आहेत. एकूण ९ दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केल्याचे सांगण्यात आले आहे. दहशतवाद्यांना मदत करणार्‍यांना पकडण्यासाठी काश्मिरमध्ये व्यापक शोधमोहिम उघडण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यात येत असून त्यांना ठार मारण्यात येत आहे. तसेच त्यांच्या हितचिंतकांवरही लष्कराची करडी नजर आहे.

Related Articles

Back to top button