देश - विदेश
ब्रेकिंग! पहलगामनंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा थरार

- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे देश हादरला. या हल्ल्याच्या सहाव्या दिवशीच दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. काल मध्यरात्री दहशतवाद्यांनी कुपवाडामधील कंडी येथे हल्ला केला. यावेळी दहशतवाद्यांनी दहशतवाद्यांनी सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली.
- मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काल मध्यरात्री संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात ४५ वर्षीय सामाजिक कार्यकर्ते गुलाम रसूल मगरे जखमी झाले. गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या मगरेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, पण उपचरादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
- पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, काल मध्यरात्री उशिरा कांदी खास येथील सामाजिक कार्यकर्ते मगरे यांच्या निवासस्थानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात मगरे हे जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी सामाजिक कार्यकर्त्याला का लक्ष्य केले? हे अद्याप कळलेले नाही.
- दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात ६३ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर सुरक्षा यंत्रणांनी छापे टाकण्यात आले आहेत आणि १,५०० हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकट्या अनंतनागमधून १७५ संशयितांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी श्रीनगर आणि इतर अनेक ठिकाणी दहशतवाद्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत आणि संशयितांना ताब्यात घेतले आहे.