महाराष्ट्र
ब्रेकिंग! दीड वर्षाचे बाळ दगावले

- राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तसेच विविध रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणाही दिसून येत आहे. दरम्यान सांगली मिरज येथील रुग्णालयात तोडफोडीची घटना घडली आहे. मिरजेतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश अमनापुरे यांच्या रुग्णालयात दीड वर्षाचे बाळ दगावले. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नाहीत, म्हणून बाळ दगावल्याच्या रागातून हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांनी तोडफोड केली. यात लाखो रुपयांचे वैद्यकीय साहित्य आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सदर तोडफोड मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
- नातेवाइकांनी एक वर्षाच्या बालकाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले होते. उपचारापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला. नबी इलाई मुजावर असे मृत 13 महिन्याच्या बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन याचा अधिक तपास करत आहे.