सोलापूर ब्रेकिंग! कोणाला शिवीगाळ करतो आम्ही काय बांगड्या घातले आहेत का?

सोलापूर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून तरुणास गवत कापण्याच्या विड्याने कमरेवर मारून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ६ जानेवारी रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास देशमुख पाटील वस्ती येथे घडली.याप्रकरणी सुरज किरण बनसोडे (वय-२६,रा .देशमुख पाटील वस्ती) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अनिल विष्णू माने, प्रदीप विष्णू माने ,प्रशांत विष्णू माने ,सुनील विष्णू माने (सर्व रा.देशमुख पाटील वस्ती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादीच्या चुलत्याची दुचाकी क्रमांक एमएच.१३.सीसी.१८०५ ही गाडी फिर्यादीच्या ओळखीचा प्रणव तुकाराम बनसोडे यास देऊन गाडी फिर्यादीच्या घरासमोर लाव असे सांगितले असता, प्रणव याने गाडी फिर्यादीच्या घरासमोर न लावता अनिल माने यांच्या घरासमोर लावली. त्यावेळी फिर्यादी घरी येत असताना फिर्यादी यांना गाडी ही वरील संशयित आरोपी यांच्या घरासमोर दिसली व प्रणव तेथे नव्हता. तेव्हा फिर्यादीने गाडी कुठे लावायला सांगितली होती असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर वरील संशयित आरोपी यांनी घराच्या बाहेर येऊन कोणाला शिवीगाळ करतो आम्ही काय बांगड्या घातले आहेत का ? असे म्हणून फिर्यादीशी वाद घालून प्रदीप माने याच्या जवळ असलेल्या गवत कापण्याच्या विळ्याने फिर्यादीच्या कमरेवर मारून जखमी केले तसेच अनिल माने व सुनील माने यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भालशंकर हे करीत आहेत.