राजकीय
पाच वर्षे नाही, पाचच महिन्यात मतदारांची लाट, एवढे मतदार कसे वाढले ?

- विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशासह राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातच आता इंडिया आघाडीने निवडणुकीत झालेले मतदान, मतदार यादी आणि निकालांच्या धर्तीवर काही पुरावे सादर करत थेट निवडणूक आयोगालाच सवाल केला आहे.
- दिल्लीत इंडिया आघाडीच्यावतीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत माध्यमांना संबोधित करत ही निरीक्षणपर माहिती सादर केली.
- महाराष्ट्रातील निवडणुकांचे अभ्यासपर निरीक्षण केल्यानंतर यातील आकड्यांमध्ये मोठी तफावत आढळून आली. लोकशाहीमध्ये विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने ही माहिती पाहावी. महाराष्ट्रात पाच वर्षांत 34 लाख नवीन मतदार जोडले गेले होते, पण लोकसभा निवडणुका झाल्या आणि पाच महिन्यातच अचानक 39 लाख नवीन मतदार जोडले गेले ते कसे, कोण आहेत ते? असा थेट प्रश्न राहुल गांधी विचारला.
- फक्त लोकसभा निवडणुकीतील मतदार यादी आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी आम्हाला द्या. त्यात नाव आणि तपशील असावेत. जे तुम्ही देत नाही. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की, त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ती यादी द्यावी. आम्हाला हा मुद्दा शेवटपर्यंत न्यायचा आहे, अशी ठाम भूमिका राहुल गांधी इंडिया आघाडीच्यावतीने मांडली.



