महाराष्ट्र
…तर रेशन कार्ड होणार रद्द

- राज्यात अपात्र रेशन कार्ड शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एक एप्रिलपासूनच या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण महिनाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यात बांग्लादेशी घुसखोर आढळून येत आहेत. या घुसखोरांकडे आधारकार्ड, रेशन कार्ड अशी कागदपत्रेही आढळून आली आहेत.
- या कागदपत्रांच्या आधारे हे लोक सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे आता बांग्लादेशी घुसखोरांसह अन्य कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशनकार्ड दिल्याचे आढळून आल्यास ते रद्द करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत एक आदेश जारी केला आहे. अंत्योदय, केशरी आणि शुभ्र या सर्वच शिधापत्रिकांची आता तपासण होणार आहे. अपात्र रेशन कार्ड आढळल्यास तातडीने रद्द करण्यात येणार आहे.
- या मोहिमेत रेशन दुकानदारांना अर्ज देण्यात येणार आहेत. हा अर्ज भरुन घेतल्यानंतर कोण अपात्र आहे, याची माहिती समोर येणार आहे. कार्डधारकांडून मिळणारी माहिती तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांवर राहील. त्यांच्याकडून या माहितीची शहानिशा केली जाईल. ज्यांनी रहिवासी असल्याचा पुरावा दिला नसेल त्यांना 15 दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत जर त्यांनी पुरावा सादर केला नाही तर अशी रेशनकार्ड रद्द समजली जातील.