क्राईम

राज्यात दोन गटांत तुफान राडा! वाहनांच्या काचा फोडल्या

  • राज्यात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात दगडफेक सुरु झाल्यानंतर परिसरात एकच तणाव निर्माण झाला. रस्त्यावरील नागरिक सैरावैरा पळू लागले. या दगफेकीत वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. तर काहींचे डोके फुटले आहेत. जालन्यात झालेल्या दगडफेकीत जवळपास ५ जण जखमी झाले आहेत. दगडफेकीनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
  •  दगडफेकीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दगडफेकीनंतर जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटातील दगडफेकीचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दगडफेकीत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. 

Related Articles

Back to top button