क्राईम

ते व्हिडीओ बाहेर आले तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत नेमके काय घडले याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आरोपी वाल्मिक कराडने काही कागदपत्रे मागितली ती दिली. सीलबंद दस्तऐवज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ. तसेच संतोष देशमुखांना आरोपींकडून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा न्यायालयात सादर केला आहे, अशी माहिती निकम यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

निकम पुढे म्हणाले, 24 तारखेला न्यायालयात हजर केले जाईल त्यानंतर त्याच्यावर सुनावणी होईल. आज न्यायालयामध्ये जे कागदपत्र आम्ही हजर केले त्यातला प्रत्यक्ष संतोष देशमुख यांना महाराणीचा व्हिडिओ जो सीआयडीच्या मते तपासाअंती असे दिसून आले होते की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला आहे.

परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केली की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर प्रसिद्धी मिळू नये. यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आम्ही न्यायालयाला अशी विनंती केलेली आहे.

Related Articles

Back to top button