सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरातील गजबजलेला ‘हा’ पूल पुन्हा चर्चेत

- सोलापूर शहरात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. दरम्यान, होटगी रोड आणि विजापूर रोडला जोडणारा महत्त्वचा आसरा पुल अरुंद असल्या कारणाने वेळोवेळी वर्दळीमुळे ट्राफिक जामचा प्रश्न उद्भवत होता. तसेच या पुलावर अपघात होऊन चार जणांचा बळी सुद्धा गेला होता.
- जुळे सोलापूर भागात अनेक नवीन नागरी वसाहती व लोकसंख्या कित्येक पटीने वाढल्यामुळे या आसरा पुलाचे रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे होते. तसेच होटगी रोड ते विजापूर रोड हा रस्ता मॉडल रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच या भागातील वर्ग व वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. आसरा पुलाच्या रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने वेळोवेळी निवेदने व आंदोलन केलं होते. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रयत्नाने 2023 मध्ये आसरा पुलरुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून सुमारे 35 कोटीचा निधी सुद्धा प्राप्त झाला होता. महारेलच्यावतीने जुलै 2023 मध्ये पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे फलक ही लावण्यात आले होते. पण पुलाखालील जलवाहिनी स्थलांतरित केल्याशिवाय पुलाचे काम करता येणार नाही. जलवाहिनी स्थलांतर करण्यास सुमारे दहा-बारा कोटीची गरज असून महानगरपालिका व महारेल यांच्या टोलवाटोलवीमुळे आसरा पूल रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडलेले आहे. सोलापुरातील खासदार आमदारांच्या दुर्लक्षामुळे आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील दोन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. आणखी कुण्या नागरिकाच्या बळी गेल्यावर हे काम सुरू होणार आहे का? त्यामुळे प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड व नागरिकांच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.



