क्राईम
ब्रेकिंग! धनंजय मुंडे यांना मोठा दणका

- धनंजय मुंडेंना धक्का देणारा निर्णय आज माझगाव कोर्टाने दिला आहे. कोर्टाने धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली आहे तसेच करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.
- कोर्टाच्या या निर्णयामुळे करुणा शर्माना मोठा दिलासा मिळाला आहे. माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.
- धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देखील केली होती. यामध्ये आतापर्यंत चार सुनावणी पार पडल्या, आज अंतिम सुनावणी पार पडली त्यानंतर ही याचिका फेटाळण्यात आली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला. करुणा यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मुंडेंची याचिका फेटाळण्यात आली आहे.
- करूणा मुंडेंना दोन लाखाची पोटगी देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला आहे. धनंजय मुंडेंचे स्वीकृतीपत्र आणि इच्छापत्र करूणा मुंडेंकडून कोर्टात सादर करण्यात आले होते. तर करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केलेली कागदपत्र खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून करण्यात आला होता.