क्राईम

फेसबुक लाईव्हवर पतीचा खून!

  • एकीकडे अभिषेक घोसाळकर यांच्या खून प्रकरणाने अजूनही मुंबई हादरत असतानाच आता त्यांच्या पत्नी आणि शिवसेना (ठाकरे गट) च्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना व्हॉट्सअप ग्रुपवरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुंबईत राजकीय आणि कायदा प्रशासन यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
  • अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार लालचंद पाल यांनाही या धमक्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले आहे. एका व्हॉट्सअप ग्रुपवर “Lalchand inko dekhkar sudhar ja, iski biwi ko mat marva dena” असा मेसेज पोस्ट करण्यात आला. हा मेसेज अभिषेक यांचा फोटो लावून टाकण्यात आला होता. विशेष म्हणजे, हा मेसेज नंतर ग्रुपवरून डिलीट करण्यात आला.
  • या मेसेजचा तपास करत असताना ‘गरीब नवाज नियाज कमिटी’ या व्हॉट्सअप ग्रुपचे अ‍ॅडमिन मोहम्मद हबीब वलीउल्ला सुलेमानी (33) आणि आबीद कासीम शेख (30) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ग्रुपवर ‘शरीफ’ नावाच्या सदस्याने धमकीचा मेसेज पोस्ट केल्याचा आरोप आहे.
  • शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ता आणि शाखा प्रमुख लालचंद पाल यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, मी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या वेळी घटनास्थळी होतो आणि मी प्रमुख साक्षीदार आहे. याच प्रकरणातून मला आणि तेजस्वी घोसाळकर यांना धमक्या दिल्या जात आहेत.
  • दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून व्हॉट्सअप ग्रुपचे स्क्रीनशॉट तपासले जात आहेत. धमकी देणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button