माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन असे संजय राऊतांनी म्हणताच…

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादा पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली. राऊतांनी पटेल यांना दलाल म्हटले. यावरून राजकीय वर्तुळात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. तर आता राऊतांच्या या विधानावर पटेल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. दरम्यान राऊतांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात वातावरण तापलेले आहे.
राऊत यांनी माध्यमांसमोर प्रफुल पटेल दलाल, माझ्या नादाला लागू नको, नागडा करेन अशी धमकी दिली. प्रफुल्ल पटेल, ज्यांनी बापाच्या पाठीत खंजिर खुपसला तो माणूस रंग बदलला म्हणतो. ज्या प्रफुल्ल पटेलांना मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावर इडीची कारवाई झाली. आपली संपत्ती वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेले, असा आरोप देखील राऊत यांनी केला. अमित शहांनी वॉशिंगने पटेलांना धुवून घेतले. अजित पवार यांनी स्वत:चे अवमुल्यन करुन घेतले. पटेलसारखे लोक दलाल असून त्यांनी आधी काँग्रेसची, दाऊदची दलाली केली, असे वाटत असल्याची बोचरी टीका राऊतांनी केली.
माझ्या चारित्र्यावर आणि इतिहासावर बोलण्याआधी आपण पवार साहेबांकडून माहिती घेतली असती तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली आहे. X अकाउंटवर त्यांनी पोस्ट करत राऊतांना उत्तर दिले.



