क्राईम
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने भिसे कुटुंबीयांनाच ठरवले दोषी

- पुण्यामध्ये नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप केला जात आहे. यावर आता रूग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आले आहे. दरम्यान मंगेशकर रूग्णालयाने गर्भवती महिलेच्या मृत्यूच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. तनिषा भिसे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
- तनिषा भिसे या 2020 पासून रूग्णालयामध्ये वेळोवेळी उपचार आणि सल्ला घेण्यासाठी येत होत्या. त्यांनी 2022 मध्ये 50 टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया केली होती.
- 2023 साली त्यांना रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण अन् प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता.
- सदर रुग्णासाठी ट्विन्स प्रेग्नन्सी धोकादायक होती. माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत.
- ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते. रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत, तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे, असे समितीचे मत आहे.