वाहतूक पोलिसांना कारवाईचे सर्व अधिकार

राज्यात वाहनधारकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण हे वाढत आहे. दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. आता मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे.
यापुढे मद्यपान करून गाडी चालवणारा चालक सापडल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस करणार आहेत. कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात पासपोर्ट मिळवण्यास परदेशी प्रवास करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
मद्यपान करून गाडी चालवल्यास गुन्हा दाखल होतो, ज्यात दंड, तुरुंगवास आणि वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर मद्यपान करून चालवल्यास मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी दहा हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसेच काही गंभीर प्रकरणांमध्ये मद्यपान करून वाहन चालवल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो.
वारंवार मद्यपान करून वाहन चालवल्यास वाहन चालवण्याचा परवाना रद्द होऊ शकतो. तर काही प्रकरणांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्याचे वाहन जप्त देखील केले जाऊ शकते. मद्यपान करून वाहन चालवल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता असते, ज्यामुळे जीवितहानी किंवा गंभीर दुखापत होऊ शकते.
यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्याला अटक होण्याची शक्यता असते. तेथेच किंवा पोलिस ठाण्यात ब्रेथ टेस्ट किंवा रक्ताची तपासणी केली जाते. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास चालकाला न्यायालयात जावे लागते आणि शिक्षा सुनावण्यात येते.



