ब्रेकिंग! गर्भवती मृत्यू प्रकरण, पुण्यात मंगेशकर हॉस्पिटलबाहेर राडा

पुण्यात गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामुळे वातावरण तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू झाले आहे. मंगेशकर रुग्णालयाने पूर्ण पैसे न दिल्याने डिलिव्हरी करायला नकार दिल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकले.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आहे. महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे नोटीस पाठवणार आहेत. आरोग्य उपसंचालकांनी स्थापन केलेल्या चार सदस्यीय समितीत निना बोराडे यांचा समावेश आहे. झालेल्या प्रकाराचा खुलासा दीनानाथ हॉस्पिटलकडून महानगरपालिका मागवणार आहे.
दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तनिषा यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रुग्णालयाने हे आरोप फेटाळले आहेत.