क्राईम
ब्रेकिंग! अजितदादांचा एकच इशारा अन् बीडच्या गँगला घामच फुटला

- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर एकापाठोपाठ एक अशा गुन्हेगारी घटनांनी बीड जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचले.
- कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तापल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री कडक शिस्तीच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनीच बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वत:कडे घेतली. यानंतर एकामागोमाग एक असे धडाकेबाज आणि तितकेच कठोर निर्णय घेत त्यांनी बीडमधील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
- अजितदादा हे आज बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवरही आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य केले. याचवेळी त्यांनी बीडच्या सर्वच गँगला सक्त ताकीद दिली.
- मी कामाचा माणूस आहे. फालतू गप्पा मारायला, टाईमपास करायला मला आवडत नाही. मध्यंतरी काही घटना घडल्या. त्यातून बीडची बदनामी झाली. अशा घटना परत घडू देऊ नका. वेळ पडली तर त्याच्यावर मकोका किंवा इतर कारवाई केली जाईल. तसेच पोलिसांनाही सांगेन, याला टायरमध्ये घ्या, यांसारख्या कडक शब्दांत अजितदादा यांनी सुनावले.



