महाराष्ट्र

ब्रेकिंग! छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के…

  • छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते हिंदू पदपातशाह होते, असे दावा हिंदुत्वावादी संघटनेकडून केला जातो. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दाव्याला छेद देणारी भूमिका मांडली आहे. शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, असे गडकरींनी स्पष्ट केले. कादंबरीकार विश्वास पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचे गडकरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये प्रकाशन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. 
  • छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र इंग्रजीत येतंय ही आनंदाची बातमी आहे. आमच्या मनात आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांचे स्थान मोठं आहे, असे गडकरींनी स्पष्ट केले.
  • अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर भेट झाली तेव्हा शिवाजी महाराज यांच्यावर अफजल खानने वार केला तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला. त्यानंतर अफजलखानची कबर सन्मानाने झाली पाहिजे, असा आदेश महाराजांनी दिला, असे गडकरी यावेळी म्हणाले. 
  • छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते. सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत अर्थ सर्व धर्म समभाव असा आहे. सर्व धर्माच्या सोबत समान न्याय करणे हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक देखील होते, असे गडकरींनी सांगितले.

Related Articles

Back to top button