क्राईम

पती-पत्नी आणि पाचशे तरुणी

पैसा कमवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. काही लोक चांगल्या मार्गाने पैसा कमवतात. तर काही झटपट पैसा कमवण्याच्या नादात नको तेच करून बसतात. असेच झटपट पैसा कमवणारे नोएडातील एक कपल.

नवरा-बायको ज्यांनी शेकडो तरुणींचे अश्लील व्हिडीओ घरात शूट केले आणि ते फॉरेनमध्ये व्हायरल झाले.

 

नोएडातील हे प्रकरण. ईडीने एका घरावर छापा टाकला. तेव्हा जे दृश्य पाहिले ते पाहून सगळे हादरले. या घरात नवरा-बायको राहत होते, त्यांच्या घरी शेकडो तरुणी होत्या. या तरुणी मॉडल्स होत्या. ज्या शो करत होत्या. हा शो साधासुधा नाही तर आक्षेपार्ह होता. तसेच घरातून 8 लाख रुपयेही जप्त करण्यात आले.

नवरा-बायकोने मिळून सबडिजी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी बनवली होती. कंपनी जाहीरात मार्केटिंग रिसर्च आणि ओपनियन पोलशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते. FEMA नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय होता म्हणून ईडीने धाड चाकली. तेव्हा सत्य समोर आले.

मॉडलिंगमध्ये करिअर बनवण्याच स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना हे कपल सोशल मीडियावर जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढायचे. जाहीरात पाहून तरुणी त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या. त्यांना पैशांचं आमिष देऊन अश्लील व्हिडीओच्या धंद्यात ढकलले जायचे. त्यांनी पाचशे तरुणी हायर केल्या, अशी माहिती आहे.

Related Articles

Back to top button