महाराष्ट्र
छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला अन् आम्ही गुढी बिडी…

- मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा सण रविवारी मुंबईसह राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी शोभायात्रा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
- एकीकडे हा उत्साह साजरा करत असतानाच दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गुढीपाडवा या सणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
- गुढीपाडवा सणानिमित्त विजय वडेट्टीवार यांनी सकाळीच सोशल मीडिया अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
- त्यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची! नवीन वर्ष तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, असे वडेट्टीवार यांनी म्हटले होते. मात्र संध्याकाळी रविवारी संध्याकाळी त्यांनी चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली होती.
- यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
- यावेळी त्यांनी म्हटले की, मी काही गुढी-बिढी उभारत नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याचा हा दुसरा दिवस आहे. आम्ही आनंदाची गुढी का उभारायची? मी या भानगडीत पडत नाही. ज्याला पडायचं आहे त्याला पडू दे, असे म्हणत त्यांनी मराठी नवनवर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही? असे प्रश्नही उपस्थित केले. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.



