महाराष्ट्र

मोठी बातमी!…तर तुमचे ड्रायव्हिंग लायसनच रद्द करणार

  • आता ट्रॅफिक दंड न भरल्यास तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. ट्रॅफिक पोलिस तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करू शकतात. सूत्रांनुसार, सरकारने नवीन नियमांचा मसुदा तयार केला आहे.
  • या मसुद्यानुसार जर ई-चलनाचा दंड तीन महिन्यांत भरला नाही तर चालकाचे लायसन्स रद्द होऊ शकते. तसेच वर्षभरात रेड लाइट तोडणे किंवा धोकादायक ड्रायव्हिंगसारख्या तीन चुका करणाऱ्यांचे लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करण्याचा प्रस्ताव आहे.
  • ट्रॅफिक पोलिस दरवर्षी लाखो ई-चलन जारी करतात, पण त्यापैकी फक्त ४० टक्केच लोक दंड भरतात. सरकारला ही वसुली वाढवायची आहे. कठोर नियमांमुळे लोक चलन भरण्यास गंभीर होतील, असा सरकारचा विश्वास आहे. शिवाय ज्यांचे दोन चलन थकीत असतील त्यांच्या वाहनाच्या विमा प्रीमियममध्ये वाढ करण्याचा विचारही सुरू आहे. सध्या दंड न भरल्यास कोणतीही पेनल्टी नाही आणि लोक अदालतीत चलनावर सूटही मिळते, त्यामुळे लोक मुद्दाम दंड भरत नाहीत.

Related Articles

Back to top button