क्राईम
ब्रेकिंग! बिश्नोई गँगकडून मला संपवण्याचा रचला डाव

- सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखण्यात आला होता, असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सतीश भोसले हरणांना मारुन त्याचे मांस हे सुरेश धस यांना पुरवतो, असे सांगून बिश्नोई गँगच्या काही लोकांना विमानाने मुंबईत आणण्यात आले होते. या लोकांना मला मारण्यासाठी आणले होते, असे धस यांनी एका मुलाखतीत सांगितले.
- धस यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण उचलून धरत जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्टाचे राजकारण तापवले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंसह भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही टीकेची तोफ डागली होती. पण तेच धस त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे चांगलेच बॅकफूटला गेले होते. याच ‘खोक्या’वरुन आता धस यांनी आता पुन्हा एकदा बाजी पलटवताना गंभीर आरोप केला आहे.
- खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात विमानाची तिकीट काढून राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक थेट मुंबईत आणण्यात आली. त्यांना खोक्याने सुरेश धसांना हरणाचे मांस कसे पुरवले याबाबत सांगितले आहे. यावेळी त्यांनी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या बॅटने अमानुष मारहाण, उधळलेल्या नोटा, हरणाच्या शिकारी यांवरुन होत असलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देतानाच सर्वात मोठा धक्कादायक खुलासा केला आहे.
- तो लॉरेन्स बिश्नोई. त्यांच्या समाजात हरणाला मंदिराचा दर्जा आहे. तिथपर्यंत असे नेऊन ठेवायचे की, सुरेश धस हरणाचे मांस खातो. म्हणजे काय तुमची मानसिकता आहे, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला.



