क्राईम
ब्रेकिंग! वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेला मारहाण?

- संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. तर बाजूच्या, दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे.
- त्याचबरोबर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे. ते दोघे कराड आणि घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कराड आणि घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
- सुरूवातीला त्यांची बाचाबाची झाली. नंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, जेल प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दोन गटातले दोन्ही आरोपी आमनेसामने यापूर्वी आले होते.



